(श्री) प. पु. बाबाजींच्या स्वमुखातून म्हणून त्या ज्याच्या पाशी पैसा आहे तोच सोन घेईल. ज्याच्या पाशी पुण्य आहे तोच या विधिचा महिमा पाहिल. विधीचं एकएक अक्षर म्हणजे ब्रम्हांड मोलाच आहे. लक्षात ठेवा. विद्वानाला दाखवा, भविष्यवाणाला दाखवा. कोणीही चर्चा करा की ही विधी कशी आहे ? ही विधी म्हणजे बाबांनी काही थोतांड नाही मांडल ! बाबानी कवित्व नाही केल ! जगातील वर्णन नाही केल ! जे पुरातन अमृतमय असणारे गीता, भागवत, वेद, शास्त्र यांच्यातून जस ताकांतून लोणी काढल आहे; त्याचप्रमाणे या सर्व ग्रंथातून सार काढला आहे. हे प्रत्येकास सापडणार नाही. खरे जर असतील विद्वान तर आयुष्यभर तपास केला तरी सापडणार नाही.
जरा लक्षात घ्या. हि विधी पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात येत की हे आणलं कोठून ? हे गावोगाव नसते, हे जो आद्यपुरुष त्याच्या पाशीच असते. त्या घरांत गेला म्हणजे त्या घरातला जो व्यवहार असतो त्या संताला, त्या शिव योग्याला माहित असतो. वस्तू त्यांच्यात आल्या. पार्वतीच्या रुपानं आपल्या जगात फैलल्या. देव द्यायला तयार नाही घेणारानंही घेतलं तरी काही उपयोग नाही; तर या करिता विधी म्हणजे पाहा काय सांगाव ? विधी म्हणजे मूळ शब्द असा आहे विधीयुक्त लग्न, विधीयुक्त पुजा, विधीयुक्त कार्य करणे याला डरच नाही. त्याचप्रमाणे विधी म्हटल आहे याला, ज्याच्या मुखी विधी जाण । तोचि खरा पुण्यवाण ॥ एवढा शब्द बाबांनी आत्राब लावला आहे. बाबांनी तोंडानी हे कवित्व नाही केल. तिच महत्व सांगुन राहिले तुम्हाला, की बाबा असे वर गेले खाली आले हे कवित्व नाही.
त्या विधीचा महिमा वर्णन केला. एवढ्याच कडव्यात, ज्याच्या मुखी विधीजान। तोचि खरा पुण्यवाण || अशा रितीने जरा विचार करा. ही विधी म्हणजे काय; या विधीमध्ये प्रथम गायत्री मंत्र घेतलेले आहेत. या गायत्री मंत्रावर या ब्राम्हणांनी देवाला वश करुन धोतर धुवायला लावले; अन आकाशी वाळवून मांडीवर ठेवायला लावले, म्हणून भागवतात भगवंतानी म्हणले आहे, सकळ मंत्राचा राजा | गायत्री मंत्र माझा || अन तो आला असे वाटा व्दिजा । त्यांच्या वाट्याला आला आहे. सकळ मंत्राची जननी । उपदेशिता व्दिजा जन्म करी तत्क्षणी ।। गायत्रीचा मंत्र कानांत पडला तर ताबडतोब शुद्र असता ब्राह्मण जन्माला आला. ताबडतोब ब्राह्मण झाला. या गायत्री विणा काही इतर मंत्राशी रिघ नाही गायत्री घ्याल व मंत्र जपा. रीघ म्हणजे त्याला अधिकारच नाही. पात्रताच नाही शरीरच जर शुध्द होत नाही तर मंत्र कसा जपता ! तुम्ही गायत्री घेतल्या विण काही । इतर मंत्राशी रिघ नाही ।। सकळ मंत्र लागले गायत्रीच्या पायी, न होता गायत्री संबंध मुखी रिघु न शके वेद । वेदा वंद्य गायत्री ।।
ज्याच्या मुखांत ही विधी असेल त्याच वर्णन होणार नाही. मरणप्राय झालेले लोक या विधीने फटकन संजीवन होतात. आणखीन कोणता अनुभव पाहिजे तुम्हाला, तर आताच सांगितल सोन्याला घ्यायला पैसा लागतो आणि यालाही घ्यायला पुण्य ।। जय बाबाजी ।। जय महात्माजी॥ लागत. तर ते डोक्यात बसल अन मग कोठे भावना निर्माण होईल. अन मग पुढे विधी म्हणेल. पण काही भाग्यशाली अशा म्हातारपणाला बुध्दी नसता ती बुध्दी आळून पिळून आणून त्या विधीचा संग्रह करुन मरुन गेले. हे आबाचे वडिल मारोती पाटील बाबांच्या सहवासाला होते.
ज्या वेळी डोंगरावर आले अन विधी पाहिली तल्लीन होवून गेले. त्यांनी म्हातारपणात ती-एकांतात पाठ केली. आनंद झाला, आणि मरतांना कोणत्याही देवाचं, साधुचं, गुरुचं ध्यान न करता विधीच ध्यान केल. माझी विधी आणा ते सांगतात बर कां ? बाबाच्या कानाला हात आहे. अशी कानाखाली विधी ठेवून डोक ठेवल् अन प्राण सोडला. आता त्या सद्पुरुषाच काय वर्णन कराव ? अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति स मन्दावं याति नास्त्यत्र संशय : ।। (आणि जो पुरुष मरण समयी माझेच स्मरण करीत हा देह सोडतो, तो माझ्या स्वरुपास प्राप्त होतो. यात संशय नाही.) -- अंतःकाळी ज्या माणसाला जो भास होईल तोच परमेश्वर त्याला पुरविल. अशा रीतीने या विधीचा महिमा काय वर्णन करु