विद्या विना नाही मति | मती विना नाही गति || शेती विना नाही मुक्ती | धर्मा विना नाही सद्गती || बाबाजी नेहमी म्हणत "दे हाच्या मशागतीने मनाची मशागत होते,तर शेतीच्या मशागतीने अर्थ व्यवस्थेचीमशागत होते.सर्व उद्योगाची जननी असलेल्या काळ्या आईची मनोभावे सेवा करण्यासाठी व आपल्या सर्व आर्थिक पिंडा पासून मुक्त होण्यासाठी स्वामींनी हरितक्रांतीची कास धरली.ज्या ठिकाणी स्वामींनी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी निर्जन ,पडक्या , नापीक , ओसांड जमिनीमध्ये स्वामींनी आपल्या शिष्य गणांच्या सह्कार्याने कृषी पंडितालाही अंतर्मुख करण्यास भाग पाडेल अशी उत्तम शेती फुलवली."
"वृक्ष वल्ली आम्हा सगे-सोयरे वनचरे" या न्यायाप्रमाणे स्वामीजींनी आपल्या आश्रम परिसरात सुंदर बगीचे व शेती निर्माण करून आपल्या भाविकांना नव्हे तर आम जनतेला मुक्तीचा सोपा मार्ग दाखविला आहे.वेरूळ वास्तव्यात उन्हाळ्याचे दिवस होते परतुं पेरणी दिवस असूनही बाहेर कडक ऊन पडून जमीन व वातावरन तापलेले होत.इतक्यात स्वामीजी ओरडले कि ताबडतोब शेतात भुईमुग पेरणी सुरु करा.दुपारच्या आत सर्व पेरणी आटोपली पाहिजे.त्यावेळी गावातील इतर लोक म्हणाले विहिरींना तर अपुरे पाणी त्यात जमीन उन्हाने इतकी तापली आहे कि पाय सुद्धा ठेवता येत नाही तेव्हा पेरणी कशी करायचे?स्वामीजींना स्मित हास्य केले व पुन्हा आम्हा विद्यार्थ्यांना बी आणाव्यास आश्रमात पाठविले .
त्यांच्या आलौकिक शक्ती सत्य प्रतिज्ञ वाणीचे आम्हा विद्यार्थ्यांना पूर्ण जाणीव होती.इतर भक्त लोकांच्या मदतीने दोन पोते शेगदाणे पेरले.भर उन्हात पेरणी झाली बाबाजी समोरच शेतात डोलीत बसून होते.पेरणी झाल्याचे त्यांना सांगितले व स्वामीजी च्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले कि "आपले काम आपण केले आता देवाचे काम देव करील " एक तासाचे आत सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडून सर्वत्र पाणीच पाणी झाले.इतर शेतकऱ्यांच्या जमिनीस वाफ येऊन पेरणी होई पर्यंत आश्रमातील शेतामध्ये भुईमुगाची रोपे वाऱ्यावर डोलू लागली आणि स्वामीजींच्या सत्यप्रतिज्ञ वाणी ची सत्यता झाली. स्वामीजींनी त्र्यंबकेश्वर येथे कृषी कार्य सुरु केले.बाबाजींनी ऊस,मोसंबी,केळी,द्राक्ष,चिकू,आंबराई या सारखी मोठे झाडे श्रमदानातून फुलवली होती.