श्रमदान

श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांनी सांगितलेला श्रमदान महिमा

img

जो करील श्रमदान | त्याला घडेल चारीधाम || बाबाजी म्हणायचे श्रीमंत- पैशाच्या रूपाने पुण्य कमवील, कुणी पारमार्थिक रूपाने ध्यान धारणा संन्यस्त वृत्ती ठेवून जपतप करून पुण्य कमवील,पण सर्व सामान्य अज्ञानी दरिद्री जनतेने काय करावे कि ज्यामुळे त्यांना सुद्धा पुण्याची प्राप्ती होऊन भगवंताचे काम करण्याचे समाधान मिळेल.म्हणुन सामान्य जनतेला बाबाजींनी हा श्रमदानाचा मार्ग सांगितला आहे.बाबाजी म्हणायचे कि श्रमदाना मुळे त्या व्यक्तीचा घाम गळून घामाद्वारे त्या व्यक्तीचा सर्व पापाचे क्षालन होईल म्हणुन सर्व सामान्यांना पुण्य कमविण्याचा सर्वात सोपा मार्ग श्रमदान म्हणुन सुचविला.

img

बाबाजींना श्रमदानाद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर लोक संग्रह उपलब्ध होउन अनेक मोठमोठ्या मंदिराची निर्मिती होऊ लागली.कुणी श्रमदानात जमीन देऊ लागले.कुणी दगड देऊ लागले.कुणी सिमेंट ,कुणी वाळू,कुणी स्वत:श्रमदान करू लागले आणि अशा प्रकारे भक्तीला एक महापूरच आला. श्रीमंत धनिक लोक ईश्वर कार्यास धन अर्पण करतातपण गरीब अडाणी जनता जनार्दन धन दानात कमी पडते म्हणुन धनदानाइतकेच श्रमदान श्रेष्ठ आहे हे जनार्दन स्वामींनी समाजातील जनतेला दाखवून दिले.दरिद्री नारायणांना श्रमदानातून मोक्ष घडावा ,श्रमदानातून ईश्वराच्या दारापर्यंत पोचावे यासाठी स्वामींनी आयुष्य भर जीवाचा आटापिटा केला.

स्वामी नेहमी म्हणायचे जो करील श्रमदान | त्याला घडेल चारीधाम || स्वामीं सांगण्याचे कि ईश्वराच्या दरबारातून श्रम केल्याने जो घाम निघतो त्या घामामुळे तुमची जन्मोजन्मी पापे धुतली जातात.या श्रमदानामुळे एकतेची भावना निर्माण होते.श्रमदानामुळे ईश्वाराच्या दरबारात केलेल्या कामाची तुम्हाला खूप मोठी पावती मिळते.जि तुम्हाला कठीण प्रसंगी कामी येते.आणि आपण काहीतरी दान केले याचा आनंद मिळतो तो लाख मोलाचा आहे.असे श्रमदानाचे महत्व स्वामी समजावून सांगायचे.