गोसेवा

श्री बाणेश्वर महादेव आश्रम

img

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेला सर्वात पहिला आश्रम म्हणजे ओझर येथील श्री बाणेश्वर महादेव आश्रम होय. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत नाशिकपासून पूर्वेला १६ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य वातावरणात बाबाजींचा आश्रम आहे. आश्रमासाठी येथील दहादडे परिवाराने भूदान केले.

याठिकाणी जवळूनच बाणगंगा नदी वाहते म्हणून प.पु. महात्माजींनी येथे श्री बाणेश्वर महादेव मंदिराची उभारणी केली. जगाच्या पाठीवर अजरामर स्मृती म्हणुन गणल्या गेलेल्या अनेक वास्तू या लाल दगडातच आहे. त्यात कोणार्कचे सूर्यमंदिर, कुतुबमिनार, लाल किल्ला तसेच अलीकडच्या काळातील स्वामीनारायण मंदिर, अक्षरधाम असे कितीतरी उदाहरणे देता येतील. म्हणुन ओझर आश्रमात देखील प.पु. महात्माजींच्या अथक प्रयासातून व भाविक भक्तांच्या योगदानातून एक एक दगड जागेवरच घडवुन लाल पाषाणातील तब्बल ८१ फुट उंचीचे श्री बाणेश्वर महादेवांचे मंदिर साकारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्री बाबाजी, मातोश्री म्हाळसा माता, अष्टमुर्ती शंकर, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, नवग्रह, संत मेळा इ.देवतांचे अधिष्ठान याठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे.

परमपुज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत याठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम पार पडतात. मागील अनेक वर्षांपासुन मातोश्री म्हाळसा माता पुण्यतिथी सोहळा येथे उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यात शेकडो माता भगिनी अनुष्ठानामध्ये सहभागी होवुन श्री बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त करतात. महिन्याच्या दर पौर्णिमेला श्री बाबाजी याठिकाणी उपस्थित राहुन भाविकांच्या समस्या निवारण करतात.

“जनशांतीधाम” जन - जनार्दन स्वामी महाराज शांती - शांतीगिरीजी महाराज धाम - निवास सदगुरू जनार्दन स्वामी महाराज व परमपुज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा अधिवास याठिकाणी असल्याने हे जागृत स्थान ‘जनशांतीधाम’ म्हणुन प्रचलित होत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात भाविक भक्तांना सर्व तीर्थांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे म्हणुन पुज्य बाबाजींच्या संकल्पनेतून याठिकाणी बारा ज्योतिर्लिंग, चार धाम, देवीची साडेतीन शक्तीपीठे इ. मंदिरांची कामे वेगाने सुरु आहेत. कृपया आपणही ओझर आश्रमास एकदा सदिच्छा भेट देवुन जनशांतीधामाच्या निर्माण कार्याची पाहणी करावी तसेच श्री बाबाजींचा कृपाप्रसाद प्राप्त करावा. जय बाबाजी ! जय बाणेश्वर !!

श्री बाणेश्वर महादेव आश्रम(ओझर (मिग) )

आश्रम प्रमुख़मांडलिक - 9983748884

पुजारीमांडलिक - 9983748884