गुरुकुल

श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) वेरूळ ता.खुलताबाद जि. औरंगाबाद

श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरिजि ) विद्यालय (गुरुकुल)

कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषू कदाचित।।

img

महालगाव गुरुकुलाची यशस्वी वाटचाल कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषू कदाचित।। या ब्रीद वाक्य असलेले गुरुकुल महान तपस्वी जनार्दन स्वामी महाराजांनी 1979 साली वेरूळ येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरीत सुरू केले. बाबाजींच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने हे गुरुकुल प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. प्रचलित शिक्षण पद्धती कितीही विकसित झाली तरी माणूस म्हणून माणूस घडविण्या विषयीची क्षमता केवळ गुरुकुल परंपरेतच आहे हे आजवर बाबाजींनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. या गुरुकुलाचे मागील शैक्षणिक वर्षात अनेक दैदिप्यमान यश विविध क्षेत्रात संपादित केलेले आहे त्याचाच सारांश रूपाने आढावा घेत आहे. �� गुरुकुलाची वैशिष्ट्ये �� पायाभूत शिक्षण:- दरवर्षी एक नवीन प्रयोग आम्ही राबवित असतो. त्यात बऱ्याच अंशी यश सुद्धा प्राप्त होते. सुरुवातीचे 16 जून ते 30 जून पर्यंत गुरुकुलात मुलांना फक्त पायाभूत शिक्षण दिले जाते त्यात गणिताच्या मूलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार व पाढे पाठांतर तसेच इंग्रजी मध्ये शब्द पाठांतर फळे, फुले, झाडे, प्राणी यांची नावे पाठांतर छोटे- छोटे संवाद व भूगोलात नकाशा वाचन जिल्हा, राज्य, देश, राज्य व त्यांच्या राजधान्या यांची ओळख अशाप्रकारे सर्वच विषयांचा पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम तयार करून शिकविला जातो. त्याचा चांगला परिणाम पुढील अध्यापनावर दिसून येते. तसेच मुलांचा शैक्षणिक पाया तयार होतो. अप्रगत तासिका:- पंधरा दिवसांचा पायाभूत अभ्यासक्रम राबवून मुलांची पायाभूत चाचणी घेण्यात येते. त्यात काही विद्यार्थी जेमतेम प्रगत दिसून येते त्यांच्यासाठी पुढील तीन महिन्यात प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठरवून त्यांच्या तासिका नियोजन केले जाते. लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया:- जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून जुलैच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान निवडणूक घेण्याचे ठरते. ही प्रक्रिया संपूर्ण निवडणूक आयोगाप्रमाणेच राबविण्यात येते. अधिकारी, प्रशिक्षण, मतपत्रिका छपाई, मतपेटी तयार, फुलीचा शिक्का तयार केला. बोटाला शाई लावणे, मुलांना प्रचार सभा घेण्यास संधी, स्टेज माइक व्यवस्था, मतमोजणी, उमेदवार सभा, नावे जाहीर करणे. नंतर आठवडाभराने त्यांची बैठक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन केले जाते. त्यांची बैठक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून त्यांच्या बैठकाही घेण्यात येतात. आरोग्य तपासणी:- ऑगस्ट महिन्यात खुलताबाद येथील आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेब व त्यांची सर्व टीम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधेही आवश्यकतेनुसार देण्यात येतात. गुणवंत विद्यार्थी सत्कार:- गुरुपौर्णिमेच्या महान पर्वकाळावर इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्य व्यासपीठावर मान्यवर व साधुसंताच्या उपस्थित पूजन सोहळा संपन्न केला जातो. यामागचा उद्देश हाच की त्यांचे कौतुक व इतरांना प्रेरणा मिळावी हा होय. राष्ट्रीय सन:- गुरुकुलात 15 आगस्ट, 17 सप्टेंबर, 26 जानेवारी व 1 मे हे राष्ट्रीय सण बाबाजींच्या उपस्थित व अनेक मान्यवर, भक्त परिवार यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे केले जाते. या कार्यक्रमाचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे हे सर्व कार्यक्रम मुलेच करतात. जसे सूत्रसंचलन, भाषण, देशभक्तीपर गीत व नृत्य, आयोजन व नियोजन सर्व मुलेच करतात. विविध नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथी:- वर्षभरातील सर्वच नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरा करण्यात येतात. याचे ही सर्व नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच करतात. तसेच बाबाजींची जयंती, म्हाळसा माता पुण्यतिथी, फुलामाता पुण्यतिथी, संस्कृती दिन, भूगोल दिन, मराठी राजभाषादिन, विज्ञान दिन तसेच वाचन प्रेरणा दिन असे विविध उपक्रमाचे ,आयोजन करण्यात येतात यातून विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते. इयत्ता दहावी व बारावी साठी तज्ञांचे मार्गदर्शन:- करिअरच्या वाटा या सदराखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी मोठे- मोठे व्याख्याते यांना निमंत्रित केले जाते तसेच परीक्षेला जाता जाता.....या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चिफ मॉडरेटर यांना निमंत्रित करून मुलांनी कॉपीमुक्त परीक्षा कशी द्यावी याचे मार्गदर्शन केले जाते. कॉपीमुक्त परीक्षा:- आपल्या गुरुकुलात परीक्षा ही कॉपी मुक्तच घेतली जाते. तसेच आपल्या गुरुकुलात इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र असून परीक्षा कॉपीमुक्त घेण्यात येते. इयत्ता दहावी जादा तासिका:- आपल्या गुरुकुलात नियोजन करतानाच 15 डिसेंबर पर्यंत दहावीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला असेल व पुढे पूर्ण अडीच महिन्याचा कालावधीत विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात तसेच दिवाळीनंतर गणित इंग्रजी व विज्ञान विषयाच्या ज्यादा तासिकेचे नियोजन केले जाते. वृक्षारोपण:- दरवर्षी गुरुकुलातर्फे जवळजवळ अनेक झाडांचे वृक्षारोपण करण्यात येते. शिवाय त्यांचे संवर्धनही केले जाते. वेळोवेळी खत व पाणी देणे, मुलांनीच तयार केलेले गांडूळ खत प्रकल्प व कंपोस्ट खत प्रकल्प यातून झाडांना खत दिले जाते. ग्रंथालय:- गुरुकुलात भव्य असे ग्रंथालय असून तेथे अनेक विविध ग्रंथ, मासिके, शौर्य कथा, बालकथा, कादंबऱ्या उपलब्ध असून त्याचे वाचन विद्यार्थी करीत असतात व वर्तमानपत्राचे ही वाचन मुले करतात. यात सकाळ, लोकमत, दिव्य मराठी इत्यादी वर्तमानपत्रे मुले वाचतात. पालक मेळावा:- वर्षभरात दिवाळी सुट्टी लागतेवेळी एकदा, वर्षभराच्या शेवटी एकदा पालक मेळावा बाबाजी व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होत असते पालकांच्या शंकाचे निरसन केले जाते. शिवाय दर महिन्याला शेवटी पालक भेटीचे ही नियोजन केलेले असते. त्यात मुलांच्या प्रगती संबंधी शिक्षकांशी संवाद साधला जातो, मुलांची प्रगती पालकांना माहीत होते. रायफल शूटिंग:- औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात एकमेव रायफल शूटिंग केंद्र आपल्या गुरुकुलात आहे दरवर्षी अनेक विद्यार्थी या खेळात राज्य स्तरावर खेळतात व यशही प्राप्त करतात. धनुर्विद्या:- प्राचीन काळात असलेला हा खेळ मागील वर्षापासून संस्थेने मोठ्या योगदानातून आपल्या विद्यालयात सुरू केला आहे. या खेळात पहिल्याच वर्षी पाच खेळाडू हे राज्यस्तरावर खेळले आहेत हा खेळ मुलांचा अतिशय आवडीचा खेळ आहे, यातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता हा गुण विकसित होतो. हँडबॉल :- या प्रकारात आपल्या गुरूकुलाने विभाग स्तरावर नेतृत्व केले आहे. बरेच विद्यार्थी -विद्यार्थिनी राज्य स्तरावर खेळले आहे. या खेळा व्यतिरिक्त फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, कुस्ती, योगासने, आटापाट्या, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन यासारख्या सर्वच खेळ प्रकारात मुले खेळवले जातात. प्रयोगशाळा:- आपल्या गुरुकुलात सुसज्ज व भव्य अशी प्रयोगशाळा असून एका वेळेस पन्नास विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करू शकतात. प्रयोगाचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. महिन्यात किती प्रयोग व्हावेत, याचे नियोजनही केलेले असते. अपूर्व विज्ञान मेळावा:- दरवर्षी आपल्या गुरुकुलात अपूर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आपल्या गुरुजनाच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग तयार करतात. त्यांची सुसज्ज मांडणी करून दिग्दर्शन केले जाते. तसेच संस्थेचे सचिव व पदाधिकारी या कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करतात, तसेच विज्ञानाच्या वैज्ञानिक रांगोळ्यांचे ही प्रदर्शन भरविण्यात येते त्यातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूळ रुजल्या जाते. संगणक विभाग:- ई -लर्निंग च्या युगात संगणकाला अतिशय महत्त्व आहे. संस्थेने नवीन 30 संगणक उपलब्ध करून तालुक्यातील नंबर एकचे संगणक कक्ष उभारून दिले आहे. सर्वच विद्यार्थी नियोजनाप्रमाणे दररोज संगणक हाताळतात व शिकतात तसेच मास्टर ट्रेनर ची नियुक्ती केली आहे. सोबत प्रोजेक्टर ही उपलब्ध असून शालेय अभ्यासक्रम यावरून शिकवला जातो. ऑनलाईन माहिती शोधण्यास मदत होते मुले अतिशय आवडीने संगणक शिकतात. सी. सी. टी. व्ही. कॅमेरे :- गुरुकुलाच्या प्रवेशद्वारापासून सर्व परिसर व वर्गखोल्या सी. सी.टी.व्ही. च्या निगराणीखाली आहेत. कलादालन:- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा कलेतून विद्यार्थ्यांना नव निर्मितीसाठी मदत व्हावी. म्हणून उत्कृष्ट अशी कलादालनाची ही रचना करण्यात आली आहे. या कलादालनात विद्यार्थी वेगवेगळ्या रंग माध्यमातून सुंदर पद्धतीने चित्राचे रेखाटन करतात, या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येते. तसेच या दालनात कागदकाम, नक्षीकाम इत्यादी प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी भरवण्यात येते. तसेच शासकीय रेखाकला ऐलीमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातून दरवर्षी ५० ते ७० विद्यार्थी सहभागी होवून चांगल्या ग्रेड मध्ये उत्तीर्ण होतात. परीक्षेसाठी जादा तास घेवून तयारी केली जाते. योग दिन:- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी वेरूळ केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थी जवळपास 700 विद्यार्थी याकार्यक्रमास उपस्थित होतात व वेगवेगळी योग प्रात्यक्षिक करतात. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वक्तृत्व स्पर्धा:- विविध कार्यक्रम जयंती अथवा पुण्यतिथीच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येते. तसेच संस्थेअंतर्गत गुरुकुलाचीही वकृत्व स्पर्धा घेण्यात येतात त्यात विद्यार्थी सहभागी होऊन प्रथम क्रमांक आपल्याच गुरुकुलाचे विद्यार्थी पटकावतात यातून वकृत्व कला जोपासली जाते. संस्कृत विभाग:- संस्कृत शिक्षण :- सर्व भाषांची जननी, अतिप्राचीन ज्ञानवर्धक सर्व प्रकाराच्या ज्ञानाची गुरुकिल्ली असणारी संस्कृत भाषा आहे. त्या भाषेत असणारा ज्ञानाचा साठा आपणा सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबर या ठिकाणी गुरुकुलामध्ये संस्कृत भाषेत असणारी जीवनाला योग्य मार्गदर्शन करणारी काही निवडक मंत्र व स्तोत्र या ठिकाणी शिकविली जातात. सहल विभाग:- व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचा पैलू सहल होय. सहशालेय उपक्रमाअंतर्गत क्षेत्रभेटीचे ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटीचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीला केले जाते यातून विद्यार्थ्यांची जिज्ञासावृत्ती, निरीक्षण क्षमता वाढीस लागून ज्ञानात त्यांचा भर पडते. हिंदी विभाग:- राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा :- विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आवड निर्माण व्हावी यासाठी हिंदी राष्ट्रभाषा संस्था पुणे यांच्या वतीने राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये पाच प्रकाराच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी या परीक्षेला जवळपास शंभर विद्यार्थी सहभागी होवून उत्तीर्ण होतात. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हिंदी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. तसेच 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस विद्यालयात साजरा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभाषेचे आवड निर्माण होते. आनंदनगरी:- आनंद नगरी मेळावा या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले जाते. जेणेकरून यामधून विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराचे, देवाण-घेवाण याचे ज्ञान मिळेल. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात येते. विशेष म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थी स्वतः सामानाची जुळवा-जुळव करून सुंदर छान -छान असे पदार्थ विक्रीसाठी ठेवतात. या आनंदनगरीतून जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपयांची देवाण-घेवाण होते. उत्कृष्ट निकाल परंपरा :- इयत्ता दहावी व इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखांचा निकाल दरवर्षी शेकडा ९० टक्केच्या वर आहे.

For Online Addmission

Click here

Add Goes Here

Gallery image 1 Gallery image 1 Gallery image 1