!! ॐ जनार्दनाय नमः!! मी अनिल सोमनाथ शिंदे (पिंपळद) वयाच्या अठरा वर्षे पासुन मी श्री बाबाजींच्या परंपरेत आहे,अनुष्ठान करुण माझे जीवन बदलून गेले होते मनात बाबाजीं विषयी आपार श्रद्धा असल्याने रोज भस्म लाऊन विधी करुन मी काँलेजला जात असे,तिथे सर्व मुलं मुली मला बघून सुरवातीला हसत व माझी खिल्ली उडवत असे काही दिवसांनंतर भस्म आणि हातातील कडे माझी ओळख बनली मला हसनारे आता मी प्रामाणिक, धार्मिक व बाबाजींचा निष्ठावंत भक्त आहे म्हणून मला आपेक्षीत सन्मान देऊ लागले भेटल्यावर प्रथम "जय बाबाजी" म्हणत असे,हे घडत असताना माझ्या मनात श्री बाबाजी यांचे वरची श्रद्धा आणि प्रेम अधिकच वाढत गेले जिवाभावाचे 80/90 लोकांच्या मनात श्री बाबाजींच्या भक्तीची ज्योत पेटवून त्यांच्या कडुण अनुष्ठान करुण घेतले.आणि आजपावोत त्यांचे सुखी व बाबाजीमय झालेले जिवण बघून एक विलक्षण आनंद मला वाटतो. राहीला विषय अनुभवाचा तर तो रोजच मिळत असतो,माझ्या जीवनात मी व माझा परीवार खूप सुखी व समाधानी आहोत. श्री बाबाजी दुःखांना माझ्या जवळ येऊ देत नाही. परंतु दैनंदिनी समस्या फार आहेत परंतु बाबाजी मला कुठल्याही प्रकारच्या संकटसमयी डगमगु देत नाही, फक्त डोळे बंद करून श्री बाबाजी यांचा धावा केल्यानंतर चटदीशी समस्येचं निवारण होते,बाबाजी योग्य वेळी योग्य ती दिशा दाखवतात. अद्रृष्य रुपी बाबाजी आपल्या प्रत्येक भक्तांचे रक्षण करत असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे.आजपर्यंत समाजात "जय बाबाजी" म्हणून मानाने जगण्यास मिळाले आहे मरतांनाही बाबाजींचा निष्ठावंत भक्त म्हणूनच मरण यावे आणी मारताना चे शेवटचे दोन शब्द मुखात असावे ते म्हणजे..हिच आपेक्षा..!! ॐ जनार्दनाय नमः ॐ शांतिगिरीय नमः