अनुभव

अनुभव

img
2020-10-27

जय बाबाजी जय महात्माजी माझे वडील श्री सदाशिव नामदेव बुरके हे खुप आजारी होते त्यांच्या पुर्ण शरीरावर मोस होते त्यांनी खुप दवाखान्यात उपचार घेतले पण त्यांना काहीच फरक पडला माझी आई पण कायम आजारी असायची आणि त्या नतंर आमचे चुलते विठ्ठल शंकरराव बुरके हे माझ्या आई ला आणि वडीलांना घेऊन वेरूळ आश्रमात गेले सर्व गोष्टी बाबाजींना सांगितल्या व बाबाजींनी माझ्या आईला आणि वडिलांना भस्म दिला आणि त्यांना काही दिवस बाबाजींच्या आश्रमा मध्ये सेवा सांगितली ती सेवा होती गो-सेवा माझे वडील यांनी मागंचा पुढचा विचार न करता घरादाराच विचार न करता लगेच तयार झाले आई वडील आणि त्यांच्यासोबत तीन वर्षाची मोठी बहीण पण होती बाबाजींनी तिथे राहण्याची सोय करून दिली दुसरा दिवसापासून सेवा सुरू केली आणि बाबाजींच्या आशीर्वादाने एकच महिण्यात माझ्या आईला आणि वडिलांना फरक वाटू लागला एक नाही दोन नाही तब्बल चार पाच वर्षे गो-सेवा केली बाबाजींचे आशिर्वाद प्राप्त केले आणि माझे आई वडील पुर्ण पणे बरे झाले आणि दुसरा एक आनंद माझ्या वडिलांना झाला तो म्हणजे माझा जन्म सुध्दा बाबाजींच्या आश्रमात झाला घृष्णेश्वाराच्या सान्निध्यात झाला मी सुध्दा धन्य झालो ......... आणि त्यानंतर बाबाजींची परवानगी घेऊन आम्ही थेट चार पाच वर्षांनी आमच्या गावी पोहोचलो..... त्यानतंर मी बाबाजींच्या उगाव खेडे गुरूकुलात शिक्षण घेतले आणि तिथे पण खुप चांगले अनुभव आले ...... आपली चिंता क्षणाला क्षणाला आहे सदगुरू जनार्दनाला...... जय बाबाजी ... जय महात्माजी

ज्ञानेश्वर सदाशिव बुरके

(मु पो खेरवाडी(नारायणगाव) ता निफाड जि नाशिक )

तुमचा अनुभव येथे लिहा

अनुभव लिहा

Add Goes Here

Gallery image 1
Gallery image 1
>