अनुभव

अनुभव

img
23/10/2020

मी आजारी पडले होते आणि पडल्यानन्तर माज्या हाताला मुंग्या येत होत्या . दुसऱ्या दिवशी एका कार्यक्रमात पूजेला बसले तर जीभ पण पडली परत चालू झाली . घरी आल्यानंतर फक्त दादा च घरी होते कारण सर्व मुलींचे लग्न झाले होते . हृदयेश्वर पण लांब राहत होते. आम्ही दोघंच घरात राहत होतो. दादा म्हणाले माझं थोडं सरकारी काम आहे , मी जचललो औरंगाबाद ला तू जवळच सरकारी दवाखाण्यात जाऊन ये .मी रात्री च येईल , आता सोमवार चा दिवस होता दादा निघून गेले , फारच डबा दिला . आता काय दादा घरी येणार नाही म्हणून मी शेजारच्या बाईला बाहेरून काडी लावून घ्याल सांगितले आणि मी झोपून राहिली . तर नगरसूलचे मानस आले ते शेजारणीला विचारात होते . त्यांचं बोलणं चालू होत, मी ऐकत होते पण उठून जाऊ शकत नव्हते इतका मला त्रास होत होता असं करता करता चार वाजले . दादा साहेबाना म्हणे तुम्ही जर सही केली नाही तर मी औरन्गबाद ला जाणार नाही. तर ते गेले नाही आणि पाणी पाटील घरी आले. मग म्हणे तु गेली नाही का दवाखान्यात . नाही म्हटलं , मला काही बराच वाटत नाहीमी काही गेले नाही दवाखान्यात आणि म्हणे मी पाणी प्याला आलो तर तेवढ्यात मोहन भाऊ पण आले . मी चहा ठेवला आणि चहा घेऊन आले तर मोहन भाऊ खुर्चीवर बसलेले होते , दादा पलंगवर बसलेले होते . तेवढ्यात माझे डोळे फिरले माझे तोंडाळी कुणीकडे झाले , हात हि कुणीकडे झाले आणि मला बोलताही येईना , चालत हि येईना तोंड वाकड झालं एकदम, आमचे दादा घाबरले. अरे ! अरे ! तुलाजास्त झालं म्हणून दादांनी मला पलन्गावर उचलून ठेवले. ते मोहन भाऊ हि घाबरले. आणि दादा पळत बाबाजींच्या फोटो कडे गेले आणि जोरात ओरडले बाबाजी संपला म्हणे माझा संसार आज . असे अबाबाजींना म्हंटले आणि ती विभूती घेतली आणि माज्या सर्व तोंडाला चोळली . दादाद घाबरले होते रिक्षा आणायला निघून गेले . आपण तापलेल्या तव्यावर पाणी टाकतो कसा चर्रर्रर्र आवाज येतो तस त्या विभूतीने माज्या सर्व तोंडाला चर्रर्र झालं . आणि त्या चर्रर्र झाल्यामुळे मी चालायला हि आगळे व बोलायला हि लागले आणि बाहेर रिक्षा जवळ येऊन गेले म्हणून सांगायचे झाले, नको बाई मला वैद तुझा झाडपाला, जनार्धन स्वामींच्या विभूतीचा गन आला . नको बाई मला वैद तुजी सारी दोरी , जनार्धन स्वामी दैवत माज्या घरी . असे बाबाजी रुपी दैवत आपल्याघरामध्ये, आपल्या हृदयात आहे

सुमनताई पैठणकर

(नाशिक )

तुमचा अनुभव येथे लिहा

अनुभव लिहा

Add Goes Here

Gallery image 1
Gallery image 1
>