जय बाबाजी व्हॉट इज बाबाजी ? या प्रश्नाचे उत्तर जर मिळवायचे असेल तर तुम्हाला फक्त बाबाजींवर विश्वास , श्रद्धा ठेवावी लागते. त्याच श्रद्धेची एक परिचिती म्हणून मी माझा एक छोटासा अनुभव सांगते आहे. आमच्या घरात लहान पण पासून फक्त एकच देव आहे ते म्हणजे बाबाजी नितांत श्रद्धा माज्या आई वडिलांची बाबाजींवर आहे. माझे वडील एक वाक्य नेहमी सांगायचे कि " बाबाजी कोण आहेत ? ज्यांना या जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही जे काहीही करू शकतात .. विश्वास होता त्यांच्या बोलण्यात, बाबाजींवर पण थोडं शिकले कि अक्कल थोडी जास्त येते तसेच माझे हि झाले होते .... या गोष्टीचा मला अनुभव घ्याय चा होता म्हणून मी एक संकल्प केला मनातून ज्या गोष्टी मला माहित होत्या कि ते शक्य नाही . संकल्प असा होता " मला असा पती मिळुद्या बाबाजी कि मुलगा नाशिक मधेच हवा , कॉम्पुटर मधेच शिक्षण झालेलं असाव, मुलाची सॉफ्टवेर कंपनी हवी कारण मी व्यवसाय करते तर मुलगा हि व्यावसायिक असावा , परिवार हा धार्मिक असावा , आणि सगळ्यात मोठं म्हणजे माज्या वाढदिवसाच्या आधी लग्न जमाव ज्या दिवशी संकल्प केला तिथून वाढदिवस माझा १ महिन्यानंतर होता. माज्या मनात एक दृढ विश्वास होता कि बाबाजी माझे स्वप्न नक्की पूर्ण करतील मला हि कळत होत कि जे नाही शक्य कारण सत्य परिस्तिथी हि होती कि आमच्या कास्ट मध्ये मुलं जास्त शिकत नाही मी इतकं मोठं स्वप्न घेऊन बसलीये, आत्तापर्यन्त जितके स्थळ बघितले सर्व असेच असायचे, १० वि , १२ वि ,शिक्षक , पोलीस , डी एड, बीएड ..दिवसामागून दिवस जात होते रोज नित्य नेमाने आरती विधी घ्याची सकाळी पहाटे ५ वाजता नित्यक्रम चालू होता सुरुवातीचे ८ दिवस गेले असाच एका व्हाट्सअप ग्रुपवर परिचय पत्र टाकले होते, अचानक सायंकाळी लहान भावाला कॉल आला कि मला तुमच्या बहिणीच परिचय पत्र मिळाले , बोलणे झाले ,नातेवाईक च्या ओळखी काढल्या त्यांनी बघण्याचा कार्य्रक्रम झाला मुलं मुलीचा , ती तारीख होती २३ जुलै २०१९ , वार गुरुवार , घरच्यांचे बोलणे झाले , माज्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असं ते स्थळ होते पण मला असं वाटत नव्हतं कि मी कस हो म्हणू सगळे काही अनोळखी आहे , इतका पटापट सगळं होतेय ते मला कळात नव्हतं घरच्या ना सांगितले तुम्ही लग्न फिक्स करा मी होकार तेव्हा देईल जेव्हा बाबाजी होकार देतील त्याप्रमाणे घरच्यांनी आमंत्रण दिले मुलगी बघायला या , मुलाकडचे मुलगी बघण्यासाठी घरी आले गावी सकाळी ११ वाजता मुलगी बघितली , दुपारी १ वाजता जेवण करून बैठक बसली आणि सायंकाळी ४ वाजता मुलाला नारळ टोपी उपरणे देऊन लग्न फिक्स केले. तो दिवस होता २६ जुलै २०१९ दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता मी खूप खुश होती कारण माझं जे स्वप्न होत ते १००% पूर्ण झाले होते. मी बाबाजींकडे गेली कुंडली घेऊन सांगितले तुम्हाला योग्य वाटले तर होकार द्या, मला तुमचा निर्णय मान्य राहील , बाबाजींनी पत्रिका वाचली माज्याकडे बघून हसले व सांगितले हरकत नाही करून टाका, माज्या लग्नात बाबाजींनी राहावं अशी माझी इच्छा आहे ते हि स्वप्न बाबाजींनीं पूर्ण केले. दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी श्री क्षेत्र ओझर येथे विवाह सोहळा बाबाजींच्या पावन सानिध्यात पार पडला. म्हणून म्हणतात " अश्यक्य हि शक्य करतील स्वामी " सर्व काही श्यक्य करणारी अशी आपली गुरुमाऊली आहे भाग्यवान आहोत तुम्ही आम्ही असे गुरु आपल्याला लाभले, अशे एक नाहीतर अनेक अनुभव आहेत.अश्या महान बाबाजींच्या चरणी साष्टांग दंडवत !! जय बाबाजी !!