जय बाबाजी. लोळे कुटुंबाचा जय बाबाजी भक्त परिवारातील गेल्या अनेक दशकां पासूनचा सहभाग सर्वश्रुत आहेच, मी या भाग्यवान कुटुंबातील एक छोटा सदस्य. माझ्या नेव्ही तील प्रमोशन साठी च्या अती महत्वाच्या interview साठी 2017 साली सिंगापूर ला असतानाचा अनुभव आहे. माझे वडील श्री विठ्ठलभाऊ लोळे हे तेव्हा सेवेसाठी वेरूळ आश्रमात वास्तव्यास होते आणि मी सतत सिंगापूर हून त्यांच्या संपर्कात होतो. interview साठी तिथे भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश या देशांतील मुले आलेले होते. interview घ्यायला 2 surveyors होते, एक बांगलादेशी हुसेन आणि दुसरे डेव्हिड, सिंगापूर चे च. हुसेन हे अतिशय कडक पद्धतीने सलग 5 ते 6 तास interview घेत असत आणि 10 पैकी फक्त 1 किंवा 2 मुलांना पास करत असत, त्यात शक्यतो भारतीय मुले जवळपास नसत च. त्या उलट डेविड यांचा interview 1 तासात पूर्ण होत असे आणि ते जास्तीत जास्त मुलांना पास करत असत. त्या मुळे साहजिक च सर्वांना वाटे की माझा नंबर डेविड कडेच लागावा. तर ही झाली माझ्या अनुभवाची पार्श्वभूमी. आता ज्या दिवशी माझा interview होता, त्या दिवशी मी सुद्धा प्रचंड तणावात होतो, सगळी तयारी करून, प्रश्नांची उत्तरे परत परत आठवून आणि माझा नंबर हुसेन यांच्या कडे लागू नये अशी बाबाजीं कडे मनोमन प्रार्थना करत metro ने office कडे जात होतो. शेवटच्या station ला उतरल्या वर platform cross करत असताना अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि ते म्हणाले की महात्माजीं इथे जवळ च आहेत त्यांच्याशी बोलून आशीर्वाद घे, हे ऐकून मी दचकलोच, कारण माझा स्वभाव थोडा लाजाळू असल्याने महात्माजीं सोबत मी अचानक फोन वर काय बोलणार असे मला वाटले, शिवाय थोड्याच वेळात interview सुरु होणार याचे pressure वेगळेच. तरी घाबरत घाबरत त्यांच्याशी बोललो, त्यांनी सगळी चौकशी केली, संकल्प करवून घेतला आणि बोलले की बाबाजी आणि आईवडिलांची सेवा तुमच्या कडून सतत घडत राहो. एवढे बोलून त्यांनी फोन बंद केला, आणि मी interview साठी office ला पोचलो. आणि योगायोगाने माझा नंबर हुसेन यांच्या कडेच लागला आणि मला त्या क्षणी प्रचंड दडपण आले कारण एकदा oral मध्ये fail झाल्या नंतर परत 1 महिन्या नंतरच नंबर येत असे आणि त्यादरम्यान खर्च सुद्धा खूप येत असे. तरी बाबाजींचे नाव घेऊन interview ला त्यांच्या cabin मध्ये गेलो, ते असे काही प्रश्न विचारत गेले की ज्यांची तयारी मी बिलकुल केलेली नव्हती, तरी मी कसे त्यांची उत्तरे देत गेलो मला खरंच आज पर्यंत माहित नाही. त्या दिवशी ते जरा घाईत होते म्हणून त्यांनी अडीच तास माझा interview घेऊन मला 2 दिवसांनी परत यायला सांगितले, असे या पूर्वी त्यांनी कुणाही सोबत कधी केले नव्हते, त्या नन्तर सुद्धा मला खूप tension आले, परंतु 2 दिवसांनंतर सुद्धा परत जेव्हा माझा interview झाला, तो देखील 2 तास चालला, अश्या प्रकारे एकूण 4.5 तास त्यांनी माझी परीक्षा घेतली, आणि शेवटी मला पास होण्याची अपेक्षा खूप कमी होती. परंतु जेव्हा त्यांचे सगळे प्रश्न संपले तेव्हा ते बोलले की मी तुम्हाला पास करत आहे. त्यांचे ते शब्द ऐकून माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी मनोमन बाबाजी आणि महात्माजींचा जयजयकार केला आणि त्यांचा हात हातात घेऊन वंदन करून बाहेर आलो. कारण सामान्यपणे मी ओळखू शकत होतो की महात्माजींच्या अशीर्वादाशिवाय ती परीक्षा पास होऊच शकली नसती. अश्या प्रकारे मी इतका दूर, परदेशात असताना सुद्धा महात्माजींनी माझी काळजी घेतली, जे मी कधीही विचारू शकत नाही. जय बाबाजी, जय महात्माजीं. ।।आपली चिंता क्षण क्षणाला, आहे सद्गगुरु जनार्दनाला।।