जय बाबाजी भक्त परीवार नोंदणी

महत्वाची सुचना

------***------

चित्रगुप्त सॉफ्टवेअर

1. श्री बाबाजींच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने उद्याच्या पावन प्रदोषच्या पर्वकालावर म्हणजेच 20.05.2020 रोजी भक्त परिवाराच्या सर्व भक्तांच्या सोयीसाठी चित्रगुप्त नावाचे सॉफ्टवेअर आपण शुभारंभ करत आहोत. हे सॉफ्टवेअर वेब बेस्ड एप्लीकेशन असून खालील लिंक वर माहिती टाकणे आहे.

2. jaibabaji.com/erp/

3. जर आपल्याकडे दोन किंवा जास्त मोबाईल नंबर असल्यास चित्रगुप्त सॉफ्टवेअरमध्ये आपण शक्यतो व्हाट्सअप वरच नंबर वापरावा व आपली माहिती द्यावी.

4. जो भक्त आयडी आपल्याला चित्रगुप्त सॉफ्टवेअरमध्ये दिसतो तो आपण नोंद करून आपल्याकडे ठेवावा कारण पुढील सर्व कार्यासाठी हा भक्त आयडी आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागेल.

5. आपली माहिती इंग्रजी टायपिंग मध्येच लिहावी.

6. आपले नाव लिहिताना प्रथम स्वतःचे नाव त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव व शेवटी आडनाव अशा क्रमाने लिहावे.

7. विभाग रकाना यामध्ये तालुक्याचे विभाग पाडले असतील त्या विभागाचे नाव लिहावे उदाहरणार्थ निफाड तालुक्यामध्ये चांदोरी विभाग

8. सत्यम वद या उक्तीप्रमाणे आपण देत असलेली माहिती ही पूर्णपणे बिनचूक द्यावी व माहिती भरताना कोणत्याही प्रकारची शंका आल्यास आपल्या गाव सेवक किंवा सह सेवक किंवा गट सेवक यांच्याशी संपर्क करून शंकेचे निरसन करावे.

9. शारीरिक कौशल्य, बौद्धिक कौशल्य, व्यापार या रकान्यामध्ये ही आपली माहिती दिल्यास भक्त परिवारातील सर्व भक्तांपर्यंत आपली माहिती पोहोचेल व आपल्याला काही कामे मिळू शकतील.

10. श्री बाबाजींच्या कार्यातील सेवकांनी आपल्याशी संपर्क केल्यास त्यांना सहकार्य करून आपली संपूर्ण माहिती त्यांना द्यावी ही विनंती.जय बाबाजी.