भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरूषांशी अनादी काळापासून संबंध आला आहे. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे.त्यात एक नाव म्हणजे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज होय . त्यांचे प्रमुख कार्य श्री क्षेत्र जातेगाव ,वेरूळ, त्र्यंबकेश्वर ,नाशिक ,कोपरगाव , येथे आहे. महाराष्ट्र राज्यात संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दहेगाव म्हणून एक छोटेशे गाव आहे.या गावात मधील अतिशय श्रीमंत अशा उगले पाटील घराण्यात/परिवारात गुरुमाउली जनार्दन स्वामी (मौनगिरी )महाराज यांचा जन्म झाला.गुरुवार दि.२४ सप्टेंबर १९१४ शके १८३६ रोजी सकाळी ७:४५ वा. म्हाळसापोटी भगवान शंकराने निष्काम कर्म योगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज यांच्या रुपात जन्म घेतला. बाबाजींच्या वडिलांचे नाव "श्री आप्पाजी पाटील" व आईचे नाव "मातोश्री म्हाळसादेवी." म्हाळसादेवी ह्या टापरगाव ता.कन्नड येथील मोहिते पाटलांची कन्यारत्न होत्या. भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरूषांशी कालापासून संबंध आला आहे.महाराष्ट्रात फार मोठी परंपरा लाभली आहे.त्यात एक नाव म्हणजे निष्काम कर्म योगी राष्ट्र संत जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज होय ...
|| उठा कामाला लागा || संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे. आजही असे दिव्य संस्कार ,दिव्य संत महापुरुष ,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री जगद्गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज.
Read Moreसद्गुरुचे नाममात्र ।तेचि आम्हां वेदशास्त्र । सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरुचे । या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. स्वामी शांतिगिरीजी बाबांचा जन्म साधारणतः १९६१ मध्ये नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव या ठिकाणी माता फुलाबाई व पिता यशवंतराव कांडेकर यांच्या उदरी झाला..... Read More
सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे.
Read Moreसन १९९८ साली हजारो भक्तांना सोबत घेऊन शांतिगिरी बाबांनी सद्गुरूच्या संक्ल्प पूर्तीच्या वाटेवर पाऊल ठेवले . व निफाड तालुक्यात एखाद गुरुकुल असावं अशी बाबाजींची इच्छा होती .
Read Moreसन २०००-२००१ या वर्षात शिवपुरी येथे नर्मदेश्वर ,निमगावयेथे रुद्रायेश्वर व टूणकी येथे अमृतेश्वर महादेव मंदिराचे काम बाबाजींना अपेक्षीत अशा लाल दगडात सुरु करून पूर्ण केले. स्वामी शांतिगिरी महाराजांना "श्री पंच दशनाम जुना आखाडा" यांच्याकडून 'महामंडलेश्वर' ही उपाधी देण्यात आली ,
Read Moreसन २००३ साली ‘वर्ल्ड पीस सेंटर’ यांनी सिंगापूर येथील संस्थेने “विश्वशांतीदूत ” या पुरस्काराने सन्मानित केले.
Read More* "स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय हिंदु पुरस्कार हॉलंड" यांच्याकडून २००४ साली सन्मानित करण्यात आले .
Read Moreकाशी येथील संस्कृत विश्वविद्यालयातील पंडीतांनी शांतीगिरी बाबांच्या कार्याची दखल घेवून त्यांना “अध्यात्म शिरोमणी” हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर सन २००६ मध्ये कुरुक्षेत्रावर "धर्मसंस्कार शिरोमणी” हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
Read Moreसन २०१७ मध्ये महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कारप्रदान करण्यात आला,
Read Moreॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी परम पुज्य स्वामी शांतिगिरीजीमहाराज यांच्या पावन सानिध्यात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकमास निमित्त अनुष्ठान कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.
१९ डिसेंबर २०२० ते २१ डिसेंबर २०२०